सराफा बाजारात मोठी खळबळ; अखेर ज्याची भीती होती तेच घडलं, सोन्याचे भाव थेट…

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू असून, आता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात पुन्हा तेजी पाहायला मिळाली आहे. दुसरीकडे चांदीच्या दरात मात्र मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.
आज १ ऑक्टोबर रोजी सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली. मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि पुणे येथे २४ कॅरेट सोन्याचा भाव १,४९,५८० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १,३७,११० रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवण्यात आला आहे. दिल्लीच्या सराफा बाजारातही शुद्ध सोन्याच्या दरात एका दिवसात सुमारे ७०० रुपयांची वाढ झाली.

दरम्यान, भारतात आगामी काळात सोने स्वस्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकार सोन्यावरील ड्युटी कमी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. ड्युटीमध्ये कपात झाल्यास देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीवर त्याचा परिणाम होऊन दर कमी होण्याची शक्यता आहे.


दुसरीकडे, आज चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. १ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात चांदीचा दर सुमारे २,३९,९९० रुपये प्रति किलो नोंदवण्यात आला. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत असताना चांदीच्या दरात मात्र घसरण झाल्याचे चित्र आहे.
सोन्या-चांदीच्या दरांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, डॉलरचा दर, कच्च्या तेलाच्या किमती आणि जागतिक आर्थिक परिस्थितीचा परिणाम होत असतो. त्यामुळे आगामी दिवसांत या मौल्यवान धातूंच्या दरात पुन्हा चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
