थेऊर येथील गोळीबार प्रकरणी मोठी कारवाई! आठ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई….

लोणी काळभोर : येथील आठ जणांनी उघड्यावर लघुशंका का केली असे विचारल्याच्या रागातून सुरक्षारक्षकाला हाताने व दगडाने मारहाण केली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. तसेच घटनेत एकाने सुरक्षा रक्षकांच्या अंगावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. आता या गुन्ह्यातील 8 आरोपींवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे.
ही घटना थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील जय मल्हार हॉटेलजवळ 27 डिसेंबर 2024 ला घडली होती. या प्रकरणातील आठही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर आळंदी, भोसरी, चाकण भोसरी एमआयडीसी, निगडी, दिधी, व पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामुळे कारवाई करण्यात आली आहे.
यामध्ये टोळीप्रमुख भरत तुकाराम जैद, मयूर शंकर जाधव (वय ३२, रा. मु.पो. कुरुळी, बांदल वस्ती, दत्त मंदिराच्या बाजूला ता. खेड जिल्हा पुणे), प्रथमेश उर्फ सोन्या आनंदा वाहिले (वय २३, रा केळगाव, चिंबळी, आळंदी रोड, राधाकृष्ण मंदिराजवळ ता. खेड, जि. पुणे) सतीश बारीकराव लोखंडे (वय 31) अजय दशरथ मुंढे ( भानुदास दत्तात्रय शेलार (वय 32 सर्व रा. चिंबळी फाटा, ता. खेड, जि. पुणे) व बाजीराव रामराव सरांडे (रा. कुरुळी पुर्ण पत्ता माहीती नाही), व आकाश शशिकांत तावडे ( धंदा नोकरी रा. संजय गांधी नगर) यांच्यावर मोकाची कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी शीतल यांचे पती अक्षय चव्हाण यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गोळीबारात शीतल अक्षय चव्हाण (वय-32, रा. चव्हाणवस्ती, थेऊर ता. हवेली) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यामुळे याबाबत कारवाईची मागणी केली जात होती.
आरोपी आठ जणांवर खुन, खुनाचा प्रयत्न, दंगा, बेकायदेशीररीत्या हत्यारे बाळगुन दहशत निर्माण करणे, सार्वजनिक रस्त्यावर बेदरकापणे वाहन हाकून खुन नसलेला सदोष मनुष्य वध करणे, बेकायदेशीररीत्या हत्यार जवळ बाळगणे, बलात्कार, ठकवणुक, दहशत पसरविणे इत्यादी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.