उपमुख्यमंत्री अजित पवारांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठी कारवाई ; राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांसह 15 ते 20 जणावर गुन्हा दाखल…

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या थेट, बेधडक विधानासाठी आणि शिस्तप्रिय नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. आता त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोलापूरच्या माढा तालुक्यातील डेप्युटी एसपी अंजली कृष्णा यांच्या झालेली बातचीत व्हायरल झाली आहे. याप्रकरणी आता राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांसह 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू येथे बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन सुरु असल्याची माहिती आयपीएस महिला अधिकारी अंजना कृष्णा यांना मिळाली होती. त्यांनी घटनास्थळी जावून कारवाई सुरु केली. दरम्यान गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी कारवाई रोखण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या फोनवरून अजित पवार यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना कारवाई करु नका असे म्हणत तंबी दिली. त्यांच्या संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल करणे आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना चांगलंच महागात पडल आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पंधरा कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस माढा तालुका अध्यक्ष बाबा जगताप, संतोष कापरे, अण्णा ढाणे यांच्यासह १५ ते २० जणांवर कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर ३ दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

