ताम्हिणी घाटात मोठी दुर्घटना ; थार गाडी 500 फूट दरीत कोसळली, घाटात 4 जणांचा मृतदेह….

रायगड : ताम्हिणी घाट हा निसर्गरम्य दृश्यांसाठी ओळखला जातो, पण येथील अरुंद, घसरडे आणि वळणावळणाचे रस्ते अपघातांना आमंत्रण देतात. याच ताम्हिणी घाटात थार कारला भीषण अपघात झाला असून ही थार कार थेट पाचशे फूट दरीत कोसळली आहे.या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे-माणगाव मार्गावर मंगळवारी हा अपघात झाल्याची माहिती असून थार गाडी एका तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट 500 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. हा मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांना ड्रोनची मदत घ्यावी लागत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी, चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.अखेर आज सकाळी ताम्हिणी घाटातील दरीत चक्काचूर झालेली थार आणि चार जणांचा मृतदेह आढळून आला आहे. आणखी दोन जण बेपत्ता असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान या अपघाताचे नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र प्रथमदर्शनी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानेच गाडी दरीत कोसळली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. ड्रोनद्वारे परिसराची तपासणी सुरू असून चार मृतदेह दिसून आले आहेत. ते वर आणण्याचे काम सुरू आहे. बचाव पथक दोरखंड, क्रेन आणि इतर उपकरणांच्या मदतीने हे रेस्क्यू ऑपरेशन करत आहे. वाहनात आणखी प्रवासी होते का, याचा तपासही सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
