मूळ शिवसेनेच्या दाव्यावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी ; सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार…!
नवी दिल्ली : एकनाथ शिंदे गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
मंगळवारी, अधिवक्ता कपिल सिब्बल यांनी, उद्धव गटाच्या वतीने उपस्थित राहून, सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. जी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली.
त्यावर बुधवारी दुपारी साडेतीन वाजता सुनावणी होईल, असे न्यायालयाने सांगितले होते. शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने आव्हान दिले आहे. ठाकरे गटाचे प्रतिनिधित्व करणारे वकील कपिल सिब्बल यांनी मंगळवारी मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती पीएस नरसिंहा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख केला. सिब्बल म्हणाले, निवडणूक आयोगाच्या आदेशाला स्थगिती दिली नाही तर ते चिन्ह आणि बँक खाती ताब्यात घेतील. कृपया उद्या घटनापीठासमोर त्याची यादी करावी. “