महायुतीतील वाद चव्हाट्यावर? गोगावलेंपाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही कॅबिनेटला अनुपस्थित, कारण काय?


मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच महायुतीत शिवसेना शिंदे गटाचे खच्चीकरण सुरू असल्याचे म्हटले जात असताना आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. पालकमंत्री पदाचा तिढा पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत भरत गोगावले यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील अनुपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महायुतीत नेमकं चाललंय काय, याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदन कार्यक्रमावरून राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असणारे भरत गोगावले हे आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली होती.

त्यानंतर आता उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे देखील अनुपस्थित राहणार आहेत. यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आले आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद आहे.

भरत गोगावले आणि आदिती तटकरे या दोघांनीही हक्क सांगितल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी यांनी पालमंत्रिपदाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कोण करणार? असा प्रश्न उभा ठाकला होता. मात्र राज्य शासनाने परिपत्रक काढून आदिती तटकरे याच ध्वजारोहण करणार असल्याचे जाहीर केले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी अनुपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे श्रीनगर मध्ये आहेत. शिवसेना शिंदे गटाने सोमवारी जम्मूमध्ये रक्तदान शिबीर आयोजित केले होते. त्यानिमित्ताने शिंदे हे जम्मू-काश्मीरमध्ये आहेत. मात्र, आज ते श्रीनगरला राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!