Maharashtra : राज्याचा नेमका मूड काय? विधानसभेत कोण बाजी मारणार? सगळी आकडेवारी आली समोर…

Maharashtra : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.
महाराष्ट्रात सध्याच्या घडीला तब्बल ७ प्रमुख पक्ष बनले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख प्रादेशिक पक्षांमध्ये झालेल्या फुटीनंतर महाराष्ट्राची ही पहिली विधानसभा निवडणूक असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक ओपिनियन पोल समोर आला आहे. ओपिनियन पोलनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि मविआत कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
महायुतीला १३७ ते १५२ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर मविआला १२९ ते १४४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. या ओपिनियन पोलनुसार, भाजपच राज्यातला एक नंबरचा पक्ष असणार आहे. पण भाजपच्या जागा घटणार आहेत.
ख्यमंत्रीपदासाठी आवडता चेहरा कोण?
विशेष म्हणजे मुख्यमंत्रीपदासाठी आवडता चेहरा कोण? याबाबतली सर्व्हे करण्यात आला आहे. पोलनुसार, राज्यातील ३७ टक्के जनतेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच चेहऱ्याला जास्त पसंती आहे. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यांना प्रत्येकी २१ टक्के पसंती आहे. शरद पवारांना १० टक्के आणि इतरांना ११ टक्के पसंती मिळाली आहे.