Maharashtra Weather : नवीन वर्षाचे स्वागत पावसाने होणार, पुढील ४८ तासात राज्यात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज…


Maharashtra Weather : मागील २ दिवसांपासून राज्यातील तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा १० अंशांच्या पुढे गेला आहे. ३० डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान राज्यासह देशाच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह उपनगर, ठाणे, कोकण आणि विदर्भात थंडीची लाट पसरली आहे.

देशाच्या उत्तरेकडे तापमानात घट झाल्याचा परिणाम महाराष्ट्राच्या वातावरणावरही दिसून येत आहे. सध्या राज्यातील थंडी कमी झाली आहे. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ढगांमुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग कमी झाला आहे.

परिणामी किमात तापमानात किंचित वाढ झाली आहे. मात्र, गारठा कायम आहे. नागरिक शेकोटी आणि गरम कपड्यांच्या आधार घेताना दिसत आहेत. दरम्यान, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वर्षाच्या शेवटी नववर्षाच्या सुरुवातीला पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. Maharashtra Weather

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात अहमदनगर, पुणे, जळगाव, कोल्हापूर आणि महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक थंडी आहे. हवामाना खात्याच्या अंदाजानुसार, २ जानेवारीपर्यंत थंडी वाढण्याची शक्यता असून त्यानंतर तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि अरबी समुद्रावर बाष्पयुक्त ढग निर्माण झाल्यामुळे राज्यासह देशाच्या हवामानावर याचा परिणाम दिसून येणार आहे, त्यामुळे २ जानेवारीपर्यंत राज्यात देशात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!