Maharashtra Voting : महाराष्ट्रात मतदानाला गालबोट, अनेक ठिकाणी मतदान केंद्र फोडले, इंदापूरमध्ये तर आमदारांकडून मतदारांना दमदाटी…


Maharashtra Voting : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र शांतेत मतदान सुरू आहे. पण बीडमध्ये मतदानाला गालबोट लागलं आहे. घाट नांदूरगाव येथील मतदान केंद्रावर हल्लेखोरांनी ईव्हीएम मशीन तोडून मतदान प्रक्रिया ठप्प केली.

ही घटना घडल्यानंतर मतदान केंद्रावर तणाव निर्माण झाला आणि बोगस मतदान रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या कार्यकर्त्यांना धक्के बसले. हल्लेखोरांनी तीन मतदान केंद्रांवर तोडफोड केली असून, या प्रकरणी पोलिस प्रशासनात खळबळ माजली आहे.

दरम्यान, यापूर्वी, परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माधव जाधव हे बोगस मतदान रोखण्यासाठी शरद पवार गटाच्या नेतृत्वात मतदारसंघात गेले होते. परंतु, त्यांना काही अज्ञात व्यक्तींनी मारहाण केली आहे.

       

चार ते पाच जणांच्या गटाने जाधव यांना बेदम मारहाण केल्याने या घटनेला मोठा वाद निर्माण झाला. मारहाण झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या नावाच्या घोषणा दिल्या, ज्यामुळे आक्रमकतेची स्थिती निर्माण झाली आहे. Maharashtra Voting

तसेच हल्ल्याच्या घटनेनंतर, घाट नांदूरगाव, चोथेवाडी आणि मुरंबी गावांमधील मतदान केंद्रांवर तोडफोड झाली. या तोडफोडीमुळे मतदान प्रक्रिया विस्कळीत झाली. पोलिस उपविभागीय अधिकारी अनिल चोरमले यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले.

तसेच, धुडगूस घालणाऱ्यांना अटक केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच इंदापूरमध्ये आमदार दत्तामामा भरणे यांनी मतदारांना दमदाटी केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!