Maharashtra Politics : मुख्यमंत्री फडणवीसांसोबतच्या भेटीत काय झाले? भुजबळ म्हणतात, मी त्यांना सगळं…


Maharashtra Politics महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून डावलल्याने नाराज झालेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. भुजबळांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळांनी माध्यामांशी संवाद साधला. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मी आणि समीर भुजबळ आम्ही भेट घेतली. निवडणुकीत आपल्याला महाविजय जो मिळाला आहे.

त्यात ओबीसीचे पाठबळ जे लाभलं त्याबद्दल आभार मानले. तसेच ओबीसींचे नुकसान होणार नाही. याची मला देखील खूप काळजी आहे, असं देवेंद्र फडणवीस बैठकीत म्हणाल्याची माहिती, असे छगन भुजबळांनी दिली आहे. Maharashtra Politics

तसेच इतर घटकांसोबत ओबीसींमुळे महायुतीला चांगले यश मिळाले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ओबीसी संघटनांच्या बैठका सुरू असून त्यांच्या नाराजीची कल्पना असल्याचे फडणवीसांनी म्हटले असल्याचे भुजबळांनी सांगितले. ओबीसींनी महायुतीला भरभरुन आशिर्वाद दिला. त्यामुळे ओबीसींचे नुकसान होऊ नये अशी अपेक्षा असल्याचा मुद्दा आपण मांडला.

त्यावर, सरकारही ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासन फडणवीसांनी दिले असल्याचे भुजबळांनी सांगितले. ओबीसींच्या मु्द्दावर 8-10 दिवसात पुन्हा भेटू आणि मार्ग काढू असेही आश्वासन फडणवीसांनी दिले असल्याचे भुजबळांनी सांगितले. ओबीसींवर अन्याय होणार नाही, मी साधक-बाधक विचार करतोय असा निरोप ओबीसी संघटनांना द्यावा असेही फडणवीसांनी म्हटले असल्याचे भुजबळांनी म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!