Maharashtra Politics : ठरलं एकदाच! शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाची तारीख ठरली, १० जानेवारीला लागणार निकाल


Maharashtra Politics : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल काय लागणार याकडे राज्यासोबतच देशाचं लक्ष लागलं आहे. १० जानेवारीला बुधवारी दुपारी ४ नंतर लागणार निकाल लागण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे, त्यामुळे त्यांच्या बाजूने निकाल आला तर पुन्हा राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता आहे. दरम्यान हा निकाल कोणत्या दिवशी किती वाजता लागणार याची माहिती समोर आली आहे. Maharashtra Politics

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला आहे. बुधवारी दुपारी ४ नंतर लागणार निकाल लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विधीमंडळात निकालातील शाब्दिक त्रूटी दूर करण्याचे काम सुरु असून निकालातील ठळक मुद्दे फक्त वाचले जाणार आहेत. सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार असल्याचीही माहिती आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील कायदेतज्त्रांकडे पाठविला असल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या १० जानेवारीला नेमका काय निकाल येणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!