Maharashtra Politics : मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांनी केला, देवेंद्रे फडणवीस यांचे मोठे विधान..

Maharashtra Politics : राज्यात सध्या मराठा आरक्षण मुद्दा पेटला आहे. अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवार यांनी केला. असे मोठे वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे.
शरद पवार यांचा सर्वात मोठा विरोध मराठा आरक्षणासाठी होता. स्वत:च्या नेतेपदासाठी शरद पवारांनी दोन समाजाला झुंझवत ठेवल्याचे देखील देवेंद्र फडणीस म्हणाले आहे. Maharashtra Politics
मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. शरद पवार यांच्या मनात असते तर त्यांनी मंडल आयोगाच्या वेळीच मराठा समाजाला आरक्षण दिले असते असे फडणवीस म्हणाले.
त्यांना कधी मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते. त्यांना फक्त दोन समाजाला झुंझवत ठेवायचे होते असे म्हणत फडणवीसांनी शरद पवारांवर टीका केली आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.