Maharashtra Politics : शरद पवार भाजपसोबत जाण्यास तयार होते, उद्योगपतीच्या घरी पुण्यात अजितदादा आणि पवारांची चर्चाही झाली होती, बड्या नेत्याचा गौप्यस्फोट…

Maharashtra Politics : अजित पवारांनी रा्ट्रवादीत बंड करून युती सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर शरद पवार ५०% भाजपासोबत येण्यास अनुकुल होते, असा धक्कादायक गौप्यस्फोट प्रफुल पटेल यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
प्रफुल पटेल म्हणाले की, शरद पवार हे भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी ५० टक्के सहमत होते. आम्ही १५ आणि १६ जुलैला शरद पवारांना भाजपसोबत जाण्याबाबत विनंती केली होती. पुण्यात उद्योगपतीच्या घरी दादा-पवार भेटही झाली होती, असा खळबळजनक दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की, अजित पवार आणि आमच्या इतर मंत्र्यांनी २ जुलैला सरकारमध्ये सहभागी होत मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आम्ही दोनवेळा शरद पवार यांना आमच्यासोबत सत्तेत येण्यासाठी विनंती केली होती. Maharashtra Politics
इतकेच नाही तर आम्ही शरद पवार यांच्या पायाही पडलो होतो. आता जे झालं ते झालं. तुम्ही आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला नाही. पण आमची विनंती आहे की, तुम्ही या, असेही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी फार कमी शब्दांत प्रतिक्रिया दिली. पण प्रफुल्ल पटेल जे बोलत आहेत ते सत्य असल्याचं फडणवीस म्हणाले. मी आता त्याच्यावर निवडणुकीत काही बोलणार नाही. यापूर्वीदेखील बोललो आहे. पण हे सत्य आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.