Maharashtra Politics : अजित पवारांना बारामतीत अजून एक मोठा धक्का! शिवसेनेचा बडा नेता घेणार वेगळीच भूमिका…

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारण अनेक घडामोडी सध्या घडताना दिसत आहे. राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. सर्व पक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग कधीही निवडणुका जाहीर करू शकते.
अशातच महायुतीतील मित्र पक्षांमध्ये मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे अजितदादांना बारामतीत मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. विधानसभेच्या जागा ठरवल्याशिवाय लोकसभेचे काम नाही करणार नाही. जरी नेत्यांनी सांगितले तरी काम कोण करणार नाही, असा इशारा विजय शिवतारे यांनी दिला आहे.
मी सध्या सबुरीची भुमिका घेतली आहे. ज्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबतीत स्पष्ट करतील, तेव्हा निश्चितपणे यातून मार्ग निघेल, असे शिवतारे यांनी स्पष्ट केले आहे. Maharashtra Politics
दरम्यान, सध्या जागावाटपावरून रस्सीखेच सुरु असून तिन्ही पक्षांचे नेते आपलाच दावा सांगत आहेत. शिवतारे हे पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून येतात. याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.