Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीआधीच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! आता अजून एक खासदार भाजपच्या वाटेवर…

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या असताना ठाकरे गटाचा एक खासदार सोडचिठ्ठी देणार असल्याचे समजत आहे.

ठाकरे गटात असणारे खासदार कलाबेन डेलकर भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती मिळत आहे. नुकतीच त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली. ही भेट सकारात्मक झाली आहे.
त्यामुळे आता डेलकर कुटुंब आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. लोकसभा निवडणुकीपूर्वी कलाबेन डेलकर यांच्या निर्णयामुळे ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कलाबेन डेलकर स्व. खासदार मोहन डेलकर यांच्या त्या पत्नी आहेत. २०२१ साली मोहन डेलकर यांनी मुंबईतील नरिमन पाँईट येथील सी ग्रीन हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

आत्महत्येला स्थानिक प्रशासनाला जबाबदार धरले होते. पतीच्या मृत्यूनंतर पोटनिवडणुकीमध्ये कलाबेन डेलकर यांना उमेदवारी मिळाली होती आणि त्यात त्या निवडून देखील आल्या होत्या. Maharashtra Politics
दरम्यान, पोटनिवडणुकीमध्ये भाजप उमेदवाराचा पराभव करत कलाबेन डेलकर यांनी विजय मिळवला होता. ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी कलाबेन डेलकर यांच्या निवडणुकीचा प्रचार केला होता. या निवडणुकीमध्ये कलाबेन डेलकर यांनी विजय मिळवत महाराष्ट्राबाहेर निवडून येणाऱ्या पहिल्या शिवसेना खासदार ठरल्या होत्या.