Maharashtra Kesari 2023 : सिकंदर शेख ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी!! शिवराज राक्षेला चितपट करत मारले मैदान…


Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी २०२३-२४ च्या फायनलमध्ये वाशिमच्या सिकंदर शेख याने गतविजेता शिवराज राक्षेला दहा सेकंदाच्या चीत करत मैदान मारले. बलदंड शरीर यष्टीच्या शिवराजला अवघ्या दहा सेकंदामध्ये त्याने आस्मान दाखवत ६६वा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला.

प्रदीपदादा कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने फुलगाव येथील सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये स्पर्धा पार पडली. Maharashtra Kesari २०२३

मातीवरील अंतिम विभागात सिकंदरने आपला लौकिक कायम राखताना वेगवान आणि आक्रमक खेळ करत पहिल्या फेरीतच संदीपवर सातत्याने ताबा मिळवत सलग दोन गुणांचा सपाटा लावला आणि दहा गुणांची वसुली करत तांत्रिक वर्चस्वावर विजय मिळवून केसरी किताबाच्या लढतीची अंतिम फेरी गाठली.

गादी विभागात शिवराज राक्षेने कमालीचा चपळपणा दाखवत हर्षद कोकाटेचा १३ गुणांची कमाई करत तांत्रिक वर्चस्वावर पराभव करून अंतिम फेरी गाठली. हर्षदने सातत्याने शिवराजच्या पटात घुसण्याचा प्रयत्न केला. पण, शिवराजने कमालीचा चपळपणा दाखवत हर्षदला निष्प्रभ केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!