Maharashtra Election Result : पुण्यात आघाडीचा एकच शिलेदार विजयी!! वडगाव शेरीमधून शरद पवार गटाचे बापू पठारे विजयी..


Maharashtra Election Result : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथी, सत्तासंघर्ष, पक्षफुटी आणि नात्यातील दुरावा यामुळे महाराष्ट्राचे राजकारण देशभरात चर्चेचा एकच विषय होता.

या पार्श्वभूमीवर, २० नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आज २३ नोव्हेंबर २०२४ रोजी निकाल जाहीर झाला आहे. पुण्याच्या वडगाव शेरी मतदार संघातून शरद पवार गटाचे बापू पठारे विजयी झाली आहेत. अजित पवार गटाच्या सुनील टिंगरेंचा पराभव करत पुण्यात महाविकास आघाडीला एक जागा मिळवून दिली आहे. Maharashtra Election Result

बापू पठारे अवघ्या ५००० मतांनी विजयी झाले आहेत. चौदाव्या फेरीपासून बापू पठारे यांनी आघाडी घेतली होती. ती अखेरपर्यंत टिकवून ठेवत पठारे यांनी विजय मिळवला आहे. पुण्याच्या वडगाव शेरीत अखेरच्या क्षणापर्यंत महायुतीच्या उमेदवारीबाबत रस्सीखेच सुरु होती.

मुळीक यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तेच पराभवाचं कारण असल्याची शक्यता आहे. तसेच टिंगरे यांच्याबाबत पोर्शे अपघात प्रकरण नडले का? याबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत. माजी आमदार बापू पठारे यांनी भाजपमधून शरद पवार गटात प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!