Maharashtra Election 2024 : ठाकरेंचा मोठा डाव! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात दिघे कुटुंबात उमेदवारी? आतली माहिती आली समोर…


Maharashtra Election 2024 : शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर ठाण्यात ठाकरेंना मोठा धक्का बसला होता. ठाण्यातील बहुतांशी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेना साथ देत उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला. त्यानंतर आता ठाण्यावर पुन्हा आपली पकड मिळवण्यासाठी ठाकरे गटाने प्रयत्न सुरू केले आहेत.

विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कोपरी-पाचपाखडी मतदारसंघातून दिवगंत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. आनंद दिघे यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देत भावनिक साद घालण्याचा प्रयत्न ठाकरे गट करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून केदार दिघे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. केदार दिघे हे दिवंगत शिवसेना नेते, ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. शिवसेना फुटीनंतर केदार दिघे यांना शिवसेना ठाकरे गटाने ठाणे जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली.

कोपरी पाचपाखाडी जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या विरोधात केदार दिघे हे शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित होत आहे. त्यामुळे शिंदे विरुद्ध दिघे असा सामना कोपरी पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळू शकतो. Maharashtra Election 2024

दरम्यान, केदार दिघे यांनी ठाणे शहर आणि कोपरी पाचपाखडी या दोन्ही विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार, ठाणे शहरातून माजी खासदार राजन विचारे यांच्या नावाचा विचार शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठी करण्यात येत आहे.

त्यामुळे केदार दिघे हे कोपरी पाचपाखडी या एकनाथ शिंदे विद्यमान आमदार असलेल्या मतदारसंघातून शिंदेंच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केदार दिघे यांना लवकरच या सगळ्या संदर्भात पक्षाकडून आदेश दिले जाऊ शकतात.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!