Maharashtra Crime : तिसरीही मुलगी झाली म्हणून बापाने ८ दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात कोंबली तंबाखू अन्…; घटनेने उडाली खळबळ


Maharashtra Crime जळगाव : लागोपाठ तिसरी मुलगी झाली म्हणून एका बापाने आपल्याच ८ दिवसांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. (Maharashtra Crime)

आशा कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा गुन्हा उघडकीस आला असून पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. ही खळबळजनक घटना मंगळवारी (ता.१२) जळगाव जवळ उघडकी आली आहे. (Crime News)

गोकूळ जाधव, (वय. ३०) असे अटक करण्यात आलेल्या नराधम आरोपीचं नाव आहे. 

मिळालेल्या माहिती नुसार, वाकोड येथील हरिनगर तांडा येथे आरोपी गोकुळ जाधव, त्याची पत्नी आणि दोन मुलींसह राहात होता. त्याची पत्नी तिसऱ्या वेळी गरोदर होती. २ स्पटेंबर रोजी वाकोड प्राथमिक आरोग्य केंद्रात तिची प्रसूती झाली.

मात्र तिसऱ्या वेळीही त्यांच्या घरी मुलगी जन्माला आली. यामुळे संतापलेल्या गोकुळने रविवारी (ता.१०) रोजी तिचा जीव घेतला. अवघ्या ८ दिवसांच्या लेकीच्या तोंडात त्यानं तंबाखू भरून तिला झोपवले. त्यातच तिचा मृत्यू झाला असं सांगितले.

जाधव यांच्या घरी मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या जन्माची नोंद करण्यासाठी आशा कर्मचारी त्यांच्या घरी गेली होती. मात्र तेव्हा मुलगी घरात नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. तेव्हा त्या कर्मचारी महिलेने याप्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली.

त्यानंतर डॉक्टर हे वैद्यकीय अधिकारी मंगळवारी (ता.१२) गावात पोहोचले आणि त्यांनी जाधव यांच्याकडे मुलीबद्दल विचारले. तेव्हा आजारपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचं त्याने डॉक्टरांना सांगितले.

मात्र डॉक्टरांना त्याचा संशय आला आणि त्यांनी कसून चौकशी केली, त्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला. अवघ्या आठ दिवसांच्या मुलीच्या तोंडात तंबाखू भरून तिला पाळवण्यात झोपवले, त्यातच त्या मुलीचा मृत्यू झाला.

दरम्यान, फर्दापूर ते वाकोड या रस्त्यावर खड्डा खणून रात्रीच्या सुमारास त्यात लेकीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक कबुलीह त्यानं दिली. याप्रकरणी आता जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!