Maharashtra Budget 2024 : शेतकऱ्यांना केलंय वीज माफीने खूश! महिलांनाही लागले ‘लाडकी बहिण योजनेच वेध! अर्थसंकल्पाने ग्रामीण भाग म्हणतोय दादा कामचं भारी..!!

जयदिप जाधव
Maharashtra Budget 2024 उरुळीकांचन : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी काल राज्याचा शेवटचा अंतरीमअर्थसंकल्प अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात ग्रामीण भागाला काय मिळणार, म्हणून वास्तविक अपेक्षा होतीत, पण तीच अपेक्षा आता अजित पवार यांच्या दूरदृष्टीत बसून दादांनी ग्रामीण भागाचे अचूक प्रश्न हेरल्याने अर्थसंकल्पातील शेतकरी व महिलांच्या योजनांनी ग्रामीण भागात भलतेच लोक समाधानी झाले आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांचे आठ वर्षापासून थकित असलेले कृषी पंपाचे वीज बिल माफ करणे तसेच गाईच्या दूधदरात १ जुलैपासून वाढीव ५ रूपयांचे वाढीव अनुदान देण्याचा निर्णयासहीत मोफत तीन गॅस सिलेंडर देण्याचा निर्णयाचा घोषणेचे ग्रामीण भागातून मोठे स्वागत करण्यात आले असून या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारच्या वतीने अर्थसंकल्प सादर केला आहे.अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी मूळ शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला साडेसात अश्वशक्ती पर्यंत क्षमता असलेल्या कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याची महत्वपूर्ण घोषणा केली आहे. या निर्णयामुळे ८ वर्षापासून थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज बिल माफी झाली आहे.
त्यामुळे थकबाकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना वीजबिल वसुलीची टांगती तलवार आता हटली गेली आहे. या निर्णयाने अल्प व मध्यम भुधारक शेतकऱ्यांचे हजारांपासून लाख रुपयांच्या वसुलीस पात्र असलेल्या कृषीपंपाची बिले माफ झाली आहेत. त्याचबरोबर अजित पवार यांनी दुसरा सुखद धक्का देत पशुखाद्याने पिचलेल्या शेतकऱ्यांना दूधगाईच्या दूधात प्रतिलीटर ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याने दूधाच्या भावात ५ रुपयांची घसघशीत वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या दोन निर्णयांनी मोठा दिलासा मिळाला आहे. Maharashtra Budget 2024
या निर्णयासोबत शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत उच्च शिक्षण तसेच मुलींच्या उच्च शिक्षणासाठी ८ लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबात व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना पदवी शिक्षणासाठी १०० टक्के शुल्क माफ करण्यात येणार आहे. नवविवाहित मुली व महिलांसाठी मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत २१ ते ६० वयोगटातील महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये देण्यात येणार आहेत. तसेच घरघुती स्वयंपाकाणा गॅस मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत तीन वेळा गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार असल्याने महागाईच्या चटक्यातून दिलासा मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या या निर्णयांंनी ग्रामीण भागातील मोठे दिलासादायक चित्र निर्माण झाल्याने ग्रामीण भागात अर्थसंकल्पाने समाधान व्यक्त होत असून ग्रामीण भागातील जनतेकडून या निर्णयांचे स्वागत करण्यात आले आहे.