महाकुंभची व्हायरल गर्ल मोनालिसाचं नशीब चमकलं, बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत करणार काम…

मुंबई : महाकुंभमध्ये तिच्या भेदक डोळ्यांनी आणि मनमोहक हास्यामुळे व्हायरल झालेली मोनालिसा आता तिच्या घरी म्हणजेच मध्य प्रदेशातील महेश्वरला परतली आहे. ती संपूर्ण महाकुंभ दरम्यान प्रयागराजमध्ये राहून रुद्राक्ष जपमाळ विकणार होती पण १५ दिवसातच तिला महाकुंभ सोडावा लागला.
पण आता मोनालिसा पडद्यावर अधिराज्य गाजवणार असून चित्रपट करणार आहे. मोनालिसाला दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी त्यांच्या ‘द डायरी ऑफ मणिपूर’ या चित्रपटात कास्ट केले आहे.
सनोज मिश्रा त्यांच्या गावी गेले होते, जिथे मोनालिसाने त्यांची भेट घेऊन चित्रपट साइन केला. ‘द डायरी ऑफ मणिपूर’ या चित्रपटात मोनालिसा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी त्याला मुंबईत अभिनयाचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
मोनालिसा राजकुमार रावच्या मोठ्या भावासोबत काम करणार आहे. हा चित्रपट मणिपूरच्या ज्वलंत प्रश्नावर आधारित आहे. बॉलिवूड स्टार राजकुमार रावचा मोठा भाऊ अमित रावही या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
समाजातील ज्वलंत प्रश्नांवर चित्रपट बनवणारा दिग्दर्शक म्हणजे सनोज मिश्रा. त्यांचा ‘काशी टू काश्मीर’ चित्रपट असो किंवा ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’, त्यांच्या चित्रपटाला खूप विरोध झाला होता. त्याला जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या होत्या. पण त्याची पर्वा न करता सनोज मिश्राने हा चित्रपट प्रदर्शित केला आणि लोकांना तो खूप आवडला.