विकृतीचा कळस ! विवाहीत महिलेचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढुन व्हायरल करण्याची धमकी ! वाडे बोल्हाई येथील घटना…!
उरुळी कांचन : बाथरूममध्ये अंघोळ करणार्या महिलेचे मोबाईलमध्ये अश्लील फोटो व व्हिडिओ काढून पतीच्या मोबाईलवर पाठवून नातेवाईकांना व्हायरल करण्याची धमकी दिल्याची घटना वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथे घडली आहे.
गुरुवारी (ता. १६) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. याप्रकरणी एकावर लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संभाजी सर्जेराव पवार (रा. वाडेबोल्हाई, ता. हवेली) मुळ रा. बोरखेडी, ता. शेणगांव जि. हिंगोली) असे आरोपीचे नाव असून याप्रकरणी एका ३५ वर्षीय महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संभाजी पवार व फिर्यादी यांचे पूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन आरोपीने फिर्यादी बाथरुममध्ये अंघोळ करीत असताना चोरुन अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढले. फोटो आणि व्हिडिओ फिर्यादी यांच्या पतीच्या मोबाईलवर पाठवले.
दरम्यान,नातेवाईकांच्या मोबाईल नंबरची यादी पतीला पाठवून व्हिडिओ आणि फोटो नातेवाईकांना पाठवण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने पतीला पाठवलेले सर्व मेसेज डिलीट केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.