LPG Price Today : बजेटपूर्वी महागाईचा झटका, गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या किती रुपयांनी वाढली किंमत..


LPG Price Today : देशभरातील तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल करतात. आजही गॅस सिलिंडरचा नवीन दर अपडेट करण्यात आला असून १ फेब्रुवारीच्या पहाटे एलपीजी ग्राहकांना मोठा धक्का बसला.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (ता.१) सकाळी ११ वाजता लोकसभेत यंदाचा अर्थसंकल्प मांडणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हा मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प असेल. मात्र, या अर्थसंकल्पापूर्वीच ग्राहकांच्या खिशाला कात्री बसली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केल्याची माहिती मिळत आहे.

देशातील सर्व शहरांमध्ये १ फेब्रुवारी २०२४ रोजी एलपीजी सिलिंडरचे दर अपडेट करण्यात आले आहेत. तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. त्याचबरोबर घरगुती सिलिंडरचे दरही स्थिर आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत १४ रुपयांनी वाढ केली आहे. LPG Price Today

दरम्यान, आजपासून दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर १७६९.५० रुपये, चेन्नईत १७२३.५० रुपये, कोलकातामध्ये १८८७ रुपये तर मुंबईत व्यावसायिक सिलेंडरचा दर आता १७२३.५० रुपये इतका झाला आहे. गॅसच्या दरात वाढ झाल्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!