लव्ह जिहादच्या प्रकरणाने लोणार मध्ये खळबळ, हॉटेलवर नेलं वारंवार बलात्कार, गोमांस आणि बुरख्याला विरोध केल्याने फोटो केले व्हायरल..

बुलढाणा : लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढून २५ वर्षीय तरुणीला हॉटेलला नेत, कधी पिकअप वाहनात वारंवार बलात्कार केला. नंतर तिच्यावर बुरखा घालण्यास आणि गोमांस खाण्यास जबरदस्ती करू लागला. तिने नकार देऊन प्रेमसंबंध संपवले.
त्यामुळे नराधमाने तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कदायक घटनास उघडकीस आली आहे. ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरातील वाळूज एमआयडीसीत समोर आली आहे.
आयुब अमीर पठाण (वय २८, रा. लोणार, जि. बुलडाणा) असे आरोपीचे नाव आहे. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणात शनिवारी (ता.१९ एप्रिल) गुन्हा दाखल केला आहे. तरुणीही लोणारची असून, त्यांची ओळख लोणारमध्ये २०२१ साली झाली होती.
मिळालेल्या माहिती नुसार, ओळखीतून मैत्री वाढवून त्याने तिच्यावर प्रेमाचे जाळे फेकले. या जाळ्यात तरुणी अडकली. ती मैत्रिणीसोबत छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरातील रेणुका माता कमानीजवळ राहत असताना त्याने तिला २०२३ मध्ये शेंद्रा कमानीजवळील हॉटेल लोटसमध्ये नेत ७ ते ८ वेळेस तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध केले.
त्यानंतर तरुणी मिल कॉर्नर येथे राहत असताना आयुबने २५ जानेवारी २०२५ रोजी तिला यात्रेला घेऊन जातो, असे सांगून त्याच्या पिकअपमध्येही तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध केले. २६ जानेवारीलाही तिच्या लहान भावाला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याने पुन्हा बलात्कार केला.
यादरम्यान, तो तिला बुरखा घालण्यास आणि गोमांस खाण्यासाठी प्रवृत्त करू लागला. त्यासाठी शिवीगाळ करू लागला. बदनामी करण्याची धमकी देऊ लागला. तिला टिकली लावण्यास विरोध करू लागला. तिला बुरखा घालण्यासाठी दिला. त्यामुळे तरुणीने त्याच्यासोबतचे मैत्रीचे संबंध तोडले होते. मात्र त्यानंतर त्याने दोघांचे फोटो तिच्या लहान भावाच्या मोबाइलवर पाठवले.
तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तिला मारहाण करून शिवीगाळ केली. तिच्या दोन्ही भावांना जीवे मारण्याची धमकी दिली. तिच्या इन्स्टाग्राम, फेसबुक खात्यावरून मेसेज करू लागला. ही बाब पीडित तरुणीने वाळूज एमआयडीसी परिसरातील एका सामाजिक कार्यकर्तीला कळवली.
दरम्यान, त्यांनी तिला धीर देत पोलिसांत तक्रार करायला सांगितले. त्यानंतर तरुणीने तक्रार केली. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन गंभीर स्वरुपाचे गुन्हे आयुबविरुद्ध दाखल करून घटना चिखलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली असल्याने तपासासाठी तिकडे वर्ग केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.