टोमॅटोच्या दराला लागली नजर! आता पुण्यात दर आले खाली, जाणून घ्या…

पुणे : टोमॅटोचे दर चांगलेच कडाडले असून यामुळे सर्वसामान्य लोकांच्या आहारातून टोमॅटो गायब झाला आहे. टोमॅटोचा दर प्रति किलो दीडशे रुपयांच्या पार पोहचले आहे, यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसत आहे. दुसरीकडे मात्र पुण्यातून दिलासादायक बातमी समोर येत आहे.
घाऊक मार्केटमध्ये टोमॅटोचे दर प्रति किलोमागे वीस रुपयांनी कमी झाले आहेत. पुणे मार्केट यार्डमध्ये काल-परवापर्यंत टोमॅटोला प्रति किलोमागे १०० रुपयांपेक्षा अधिक दर मिळत होता. मात्र आज टोमॅटोचे दर हे प्रति किलो ८० ते ९० रुपयांवर आले आहेत.
दरम्यान, जरी घाऊक बाजारात टोमॅटोचे दर कमी झाले असले तरी देखील अद्याप किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर जैसेथे आहेत. पुण्यातील किरोकळ मार्केटमध्ये टोमॅटोला प्रति किलो १२० ते १४० रुपये एवढा दर मिळत आहे. टोमॅटोची आवक वाढत असून, येत्या काही दिवसांत टोमॅटोचे भाव कमी होण्याची शक्यता आहे.