उरुळीकांचन ,लोणीकाळभोर हद्दीतील अवैध हातभट्टी दारु अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कारवाई…!

उरुळीकांचन : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडाळमळा, शिंदवणे आणि सोरतापवाडी परिसरात हातभट्टी दारू बनविणाऱ्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी एकाच वेळी विविध ठिकाणी छापा टाकून सुमारे १ लाख ३२ हजार रुपयांची गावठी दारू तसेच दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तु आणि रसायने आदी माल पोलिसांनी धडक कारवाई करून जेसीबी मशिनचे सहाय्याने नष्ट केला आहे.

सदर कारवाई दरम्यान गावठी हातभट्टी चालवणाऱ्या व्य्वक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये राहुल व्यंकट राठोड( शिंदवणे),पंकाबाई व्यंकट राठोड (शिंदवणे ), जयश्री कांतीलाल राठोड (शिंदवणे), सोन्या उर्फ निखिल नंदू घायाळ (कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, सोरतापवाडी, शिंदवणे, लोणीकाळभोर मांडाळमळा येथे काही नागरिक जंगलामध्ये निर्जनस्थळी ज्या ठिकाणी चारचाकी वाहन जात नाही तेथे अवैध गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे काम राजरोसपणे सुरु असलेबाबत त्यांना माहिती मिळाली.

दरम्यान त्या ठिकाणी केलेल्या मालाची पाहणी केली असता काळेशिवार कॅनल जवळ, शिंदावणे येथे चार हजार लिटर गावठी हातभट्टी तयार करण्याचे पक्के रसायन तसेच दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे चार पत्र्याचे भांडे असे अंदाज ४४००० रू. किंमतीचा मुद्देमाल तसेच दुस-या पथकाने मांडाळमळा, रूपनरवस्ती, लोणी काळभोर या ठिकाणी छापा टाकून त्या ठिकाणी दोन पञ्याचे टाक्यामध्ये तसेच जमिनीत खड्डा करून काळे रंगाची ताडपत्री अंथरून त्यामध्ये साठवलेले अंदाजे ३००० लिटर गुळ, तुरटी व पाणी मिश्रित असलेले कच्चे रसायन, हातभट्टीसमोर पडलेली जळावू लाकडे, पञ्याच्या टाक्या इत्यादी साहित्य ८८,००० रु. किंमतीचा माल पोलीसांनी कारवाई करून अवैध दारुसाठा व दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन व साहित्य जेसीबी मशिनचे सहाय्याने नष्ट करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदशनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, वैभव मोरे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, बोरावके, नागलोत, साळुंखे, जाधव,राठोड, पवार, कुदळे, शिरगीरे, विर,फणसे, पुणे शहर, आरसीपी ४ व आरसीपी ५ तसेच राज्य उत्पादन शुल्क जी विभाग पुणे यांचेकडील अधिकारी व स्टाफ यांच्या पथकाने केली आहे.