Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथे जीवाची बाजी लावून विद्युत पुरवठा सुरळीत, वीज कर्मचाऱ्यांनी पावसाची तमा न करता केले मध्यरात्री काम, होतोय कौतुकाचा वर्षाव..


Loni Kalbhor News लोणी काळभोर : महावितरणचे कर्मचारी अनेकदा वेळ आली की भर पावसात, जिवाची बाजी लावत रात्री-अपरात्रीही वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी झटत असतात. असेच लोणी काळभोरमध्ये घडले आहे. शिवशक्ती व कदमवाकवस्ती येथील इस्ट हेवन येथील वीजवाहिनीत बिघाड झाल्याचे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ते दुरुस्त केले आहे. (Loni Kalbhor News)

पावसात मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तब्बल १३ मीटर उंचीच्या विद्युत खांबावर चढून विद्युतपुरवठा सुरळीत केला. या कामगिरीमुळे कर्मचाऱ्यांवर नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव (Loni Kalbhor News) होत आहे.

लोणी काळभोर (Loni Kalbhor News) येथे मंगळवारी सकाळपासूनच  जोरदार पावसाला सुरवात झाली. पावसामुळे वीजेचा लपंडाव सुरू होता. मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास येथील विद्युत पुरवठा अचानक बंद झाला. कर्मचाऱ्यांनी वीजवाहिनीत बिघाड झाल्याचे शोधून काढले.

लोणी काळभोर येथील शिवशक्ती व कदमवाकवस्ती येथील इस्ट हेवन या ठिकाणी असलेल्या वीजवाहिनीत बिघाड झाला होता. कर्मचाऱ्यांनी मुसळधार पावसात मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास( Loni Kalbhor News) तब्बल १३ मीटर उंचीच्या विद्युत खांबावर चढून, विद्युत पुरवठा सुरळीत केला.

यासाठी विद्युत तंत्रज्ञ पांडुरंग खरात, दादा चौधरी, अक्षय पाटील व विशाल मोरे रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास विद्युत पोलावर चढले. पावसात विद्युत कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता, चीनी मातीच्या पीन बदलून लोणी काळभोर गावाचा विद्युत पुरवठा सुरळीत केला.

यासाठी लोणी काळभोर शाखेचे कनिष्ठ अभियंता रामप्रसाद नरवडे, वरिष्ठ तंत्रज्ञ अमोल शेलार, श्रीकृष्ण लाड, दादा आगळे यांचे सहकार्य मिळाले. या कामगिरीमुळे कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!