Loni Kalbhor News : कदमवाकवस्ती येथे रिल्स बनवण्यासाठी सहा जणांच्या टोळक्याने ‘शिवशाहीचा’ केला पाठलाग, अपघात झाल्यावर ड्रायव्हरला मारले अन्…

Loni Kalbhor News : सोशल मीडियावर रील काढून अपलोड करण्याचे फॅड आले. तरुणाईमध्ये रील किंवा व्हिडीओ बनवण्याची क्रेझ फारच जास्त आहे. अनेकदा हे रील्स बनवताना कधी अपघात तर वादविवा झाले आहेत. या नादात तरुणाई काय करेल हे सांगता येत नाही. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.

पुणे सोलापूर महामार्गावर रील्स – बनवणाऱ्या दुचाकीवरील तिघांनी शिवशाहीच्या एस. टी. बस चालकाला कट मारल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्यांचा मोबाईल लंपास केल्याची घटना घडली आहे. Loni Kalbhor News
हि घटना गुरुवारी (ता. १२) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील युनियन बँकेच्या समोर घडली आहे.

एस. जी. कदम असे शिवशाहीच्या बस चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, सोलापूर डेपोची शिवशाही बस हि पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने निघाली होती. यावेळी हडपसरपासून दोन दुचाकीवर सहा तरुण मोबाईलवर रील्स काढत होते.
हे मोटारसायकल चालक हे हडपसरपासून शिवशाही च्या पाठीमागे पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होते. कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील युनियन बँकेजवळ आले असता शिवशाही व दुचाकी यांच्यात अपघात झाला.
या अपघातात एका दुचाकीवरील तिघेजण हे रस्ता दुभाजकावर पडले. यावेळी कदम यांनी एस.टी. बस हि जागेवर थांबवली. यावेळी दुचाकीवरील तिघांनी बस चालक कदम यांना मारहाण करून त्यांच्याजवळ असलेला मोबाईल फोन पळवून नेला. जाणाऱ्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
घटनास्थळी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे, केतन धेंडे, अक्षय कटके, व त्यांचे सहकारी पोहचले असून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत होते. पुढील कार्यवाही लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
तरुणांमध्ये रिल्सचा वाढता क्रेझ..
आजकाल रिल्स बनवण्याची क्रेझ जास्त वाढताना दिसत आहे. यासाठी लोक काहीही करताना दिसत आहेत. काही ट्रेनच्या आत डान्स करताना दिसत आहेत, तर काही स्टंट करताना रिल्स बनवताना दिसत आहेत.
तरुणाई रिल्सकडे प्रचंड आकर्षित होत आहे. सोशल मीडियावर फॉलोवर्स वाढवण्याच्या नादात आणि प्रसिद्ध होण्याच्या नादात ते हद्द पार करत असल्याचे चित्र आहे.