Loni kalbhor : लोणी काळभोर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलीने दिला बाळाला जन्म, घटनेने उडाली खळबळ..


Loni kalbhor : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एका अल्पवयीन मुलीला धमकावत तिच्यासोबत जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच याच अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली व तिने नुकताच बाळाला जन्म दिला.

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी संशयित तरुणाला अटक केली आहे. हा प्रकार जुन २०२३ ते जुलै २०२३ या कालावधीत शेवाळवाडी येथे घडला आहे.

याप्रकणी लोणी काळभोर परिसरात राहणाऱ्या पीडित १५ वर्षाच्या मुलीने रविवारी (ता.२४) हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय मल्लाप्पा मदिनकरी (वय.१८ शेवाळवाडी, ता. हवेली) याच्यावर) दाखल करुन अटक केली आहे. Loni kalbhor

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिच्या बालपणाचा गैरफायदा घेतला. तिला धमकावत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून पीडित मुलगी गरोदर राहिली. तिने नुकताच एका बाळाला जन्म दिला.

याबाबत कोणाला काही सांगितले तर लहान भावांना जीवे मारून टाकण्याची धमकी पीडितेला दिली. त्यानंतर त्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूद्ध बलात्कार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रोकडे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!