Lok Sabha Elections : भाजपला मोठा धक्का! निवडणुकीच्या आधी माजी खेळाडू असलेल्या खासदाराने केला राजकारणाला राम राम….

Lok Sabha Elections : माजी भारतीय क्रिकेटर आणि भाजप खासदार गौतम गंभीरने राजकारणातून संन्यास घेण्याची मोठी घोषणा केली आहे. गौतम गंभीरने आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीतील भाजप खासदार गौतम गंभीरने राजकारणाला रामराम ठोकला आहे. त्याने भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना एक्सवर पोस्ट करून याची माहिती दिली आहे.
‘मला जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद!’, अशा आशयाची पोस्ट गौतम गंभीरने केली आहे. Lok Sabha Elections

I have requested Hon’ble Party President @JPNadda ji to relieve me of my political duties so that I can focus on my upcoming cricket commitments. I sincerely thank Hon’ble PM @narendramodi ji and Hon’ble HM @AmitShah ji for giving me the opportunity to serve the people. Jai Hind!
— Gautam Gambhir (@GautamGambhir) March 2, 2024

गौतम गंभीर हा सध्याचा पूर्व दिल्लीतील भाजप खासदार असून त्याने आता २०२४ ची लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वीच गौतम गंभीरने राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पूर्व दिल्लीच्या जागेवर गंभीरने दमदार विजय मिळाला होता.
दरम्यान, गंभीरच्या या पोस्टवरून तो आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. गंभीरने आता राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. पण निवडणुकीपूर्वीच त्याने पक्षाला रामराम ठोकल्याने भाजपासाठी हा खूप मोठा धक्का असणार आहे. गौतम गंभीरच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.