Lok Sabha Election Result Live Updates : बारामतीत पोस्टल मतदानात सुनेत्रा पवारांची आघाडी, निकालाकडे देशाचे लक्ष…

Lok Sabha Election Result Live Updates : बारामती- अतिशय चुरशीची लढत सुरू असून बारामती लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातला हाय व्होल्टेज मतदारसंघ आहे. कारण या ठिकाणी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगला होता.

लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांच्या घरातलाच उमेदवार सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभा करत भाजपाने नवी खेळी खेळली. आता या जागेवरचा निकाल काय लागतो? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्यासाठी आशा पल्लवीत झाल्या आहेत. सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच या ठिकाणी आघाडी घेतली आहे. अर्थात हा प्राथमिक कल आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निकालासाठी काहीसा वेळ लागणार आहे. या ठिकाणी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगतो आहे. Lok Sabha Election Result Live Updates

पोस्टल मतांमध्ये सुळे यांनी आघाडी घेतली होती. पण पुढील मतमोजणीत सुनेत्रा पवारांनी आघाडी घेतल्याचे आकड्यांवरून दिसून येत आहे. पुरंदरमधून सुनेत्रा पवारांनी दहा हजार मतांनी आघाडी घेतली होती.
आता पुढील मोजणी सुळे सुप्रिया सुळे या ६हजार ९०० मतांनी पुढे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर नणंद-भाऊजय निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात दोन्ही बाजून जोरदार प्रचार झाला होता. सध्या सुरुवातीच्या कलामध्ये तर सुनेत्रा पवार आघाडीवर आहेत आणि सुप्रिया सुळे पिछाडीवर आहेत.