Lok Sabha Election 2024 : राहुल गांधी यांची दुसरी उमेदवारी जाहीर, ‘या’ ठिकाणी उतरणार मैदानात….


Lok Sabha Election 2024 : अनेक दिवस चालढकल केल्यावर राहुल गांधींची दुसरी उमेदवारी अखेर जाहीर झाली आहे. राहुल यंदा अमेठीतून नव्हे तर रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत. तर, अमेठीतून केएल शर्मा हे निवडणूक लढणार आहेत.

अर्ज भरण्याची मुदत आज संपत आहे. त्यामुळे राहुल गांधी आज दुपारीच अर्ज भरणार आहेत. प्रियांका गांधी देखील त्यांच्यासोबत असणार आहेत. शक्तिप्रदर्शनासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे.

प्रियंका गांधी या अमेठीतून लोकसभा लढविणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसापासून सुरु होत्या. या जागेवर आता किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी जाहीर झाल्याने प्रियंका या अमेठीतून लढणार या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

आता रायबरेलीत भाजपचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांच्याशी राहुल गांधी यांचा सामना होणार आहे. भारतीय जनता पक्षाने दिनेश प्रताप सिंह यांचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधींकडून पराभव झाला होता. भाजपने पुन्हा एकदा स्मृती इराणी यांना अमेठी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

रायबरेली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. २०१९च्या निवडणुकीत भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्या पराभव करुन ही जागा आपल्याकडे खेचून आणली होती. रायबरेली हा राहुल गांधी यांच्या आई सोनिया गांधी यांचा परंपरागत मतदारसंघ आहे.

राहुल गांधी हे वायनाड तसेच रायबरेलीयेथून निवडणूक लढवत आहेत. नेहरू-गांधी घराण्याच्या पारंपरिक जागेवरून राहुल गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोनिया गांधी यांनी २००४ ते २०२४ या काळात रायबरेली मतदारसंघातून निवडून आल्या होत्या.

दरम्यान, पाचव्या टप्प्यात या दोन्ही जागांसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. दोन्ही जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी पक्षाने सुरू केली आहे. या दोन्ही जागा गांधी-नेहरू घराण्याच्या सदस्यांकडे आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!