Lok Sabha Election 2024 : तुम्हाला पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवेत की राहुल गांधी? भाजपच्या सभेत लोकांनी घेतलं राहुल गांधी यांचे नाव, सभेत नेमकं काय घडलं?


Lok Sabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात कोल्हापुरात लोकसभेसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळं मतदानाला अवघा आठवडाच उरला असल्यानं प्रचाराचा धडाका सुरू आहे. भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष शौमिका महाडिक यांनी कागल शहरात प्रचार सभा घेतली.

यावेळी बोलताना त्यांनी जनतेला प्रश्न विचारला. तुम्हाला नरेंद्र मोदी पंतप्रधान हवे आहेत की, राहुल गांधी? यावर सभेत बसलेल्या एका कार्यकर्त्यानं राहुल गांधींचं नाव घेतल्यामुळं एकच हशा पिकला.

मिळालेल्या उत्तरामुळे महायुतीच्या नेत्यांसह शौमिका महाडिकही अवाक् झाल्या. देश कुणाच्या हातात द्यायचा आहे, असे म्हटल्यानंतर उपस्थितांनी राहुल गांधींचे नाव घेतल्याचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कोल्हापूरच्या कागलमध्ये महायुतीची झालेली प्रचारसभा चर्चेचा विषय बनली आहे. महायुतीच्या नेत्यासंमोरच तरुणाने चक्क राहुल गांधींच्या हातात देश देणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह व्यासपीठावरील नेत्यांसह उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. Lok Sabha Election 2024

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कागलमध्ये महायुतीच्या नेत्यांची सभा मंगळवारी पार पडली. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!