Lok Sabha Election 2024 : तुमचं नाव मतदार यादीत आहे का? नसेल तर ‘असा’ घ्या शोध, एका मिनिटात होईल काम…

Lok Sabha Election 2024 : सध्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने ठोस पावले उचलली आहेत. मतदार यादीत नावे तसेच मतदान केंद्र शोधताना होणारी गैरसोय टाळण्यासाठी आता निवडणूक आयोगाने सुविधा उपलब्घ करून दिली आहे
मतदार यादीत मतदारांचे नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदार सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याठिकाणी नागरिकांना सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या अडचणी सोडविता येणार आहे.
मतदारांना स्वत:चे नाव आणि मतदान केंद्र सापडण्यास मदत होणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच संकेतस्थळावर किंवा वोटर हेल्पलाईन ॲपच्या माध्यमातूनही मतदार यादीतील नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. Lok Sabha Election 2024
निवडणूक आयोगाने https://electoralsearch.eci.gov.in/ ही वेबसाईटवर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच मतदार चिठ्ठीचे घरोघरी वाटप करण्यात येत आहे. यामुळे जोरदार तयारी यासाठी करण्यात आली आहे.
तसेच बारामती विधानसभा सचिन निकम – 8668278718, दौंड विधानसभा बालाजी सरवदे – 9421423295, इंदापूर विधानसभा इम्रान जमादार -9890176156, पुरंदर विधानसभा ओंकार कदम -7758833378, भोर विधानसभा प्रमोद खोपडे – 9096353103 खडकवासला विधानसभा वैभव मोटे – 8055445191 यांना संपर्क साधूनही माहिती मिळेल.