सिबिल स्कोअर कमी म्हणून कर्ज नाकारता येणार नाही, कोर्टाचा मोठा निर्णय..

मुंबई : विद्यार्थ्यांबाबत कोर्टाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे राष्ट्रनिर्माते आहेत. त्यांना भविष्यात या देशाचे नेतृत्व करायचे आहे. त्यांना मदत केली पाहिजे.
सिबिल स्कोअर कमी असल्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याने शैक्षणिक कर्जासाठी केलेला अर्ज बँक नाकारू शकत नाही, असे महत्वाचे निर्देश केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिले. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
या प्रकरणातील याचिकाकर्त्या विद्यार्थ्याने शिक्षण पूर्ण करण्यासाठी बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला होता.
आधी घेतलेल्या शैक्षणिक कर्जाचा 16, 667 रुपयांचा हप्ता थकीत असल्याने बँकेने त्याला तुमचा सिबिल स्कोअर कमी आहे, असं म्हणत कर्ज देण्यास नकार दिला.
याविरोधात विद्यार्थ्याने कोर्टात धाव घेतली. विद्यार्थ्याला शैक्षणिक कर्ज नाही मिळाले तर त्याचे मोठे नुकसान होईल, असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. सिबिल स्कोअर कमी असल्यामुळे हे शैक्षणिक कर्ज नाकारण्याचे कारण असू शकत नाही, कारण कर्जाची परतफेड विद्यार्थ्याने शिक्षण पूर्ण केल्यानंतर केली जाते.