सोमेश्वर साखर कारखान्यातील विजयी उमेदवारांची यादी जाहीर; कुणाला किती मतं मिळाली?

बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ ते २०३१-३२ या कालावधीसाठी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक दिग्विजय आहेर यांनी सोमवारी रात्री उशिरा निकाल घोषित केले.

दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच थेट निवडणुकीला सामोरे जात होत्या. या निवडणुकीत त्यांना यश मिळाले आहे. दरम्यान, निकालानंतर रात्री उशिरा जय पवार यांनी अजित पवार यांच्या स्मारकस्थळी जाऊन अभिवादन केले.
निवडणुकीतील यशानंतर सुनेत्रा पवार यांनी सभासद शेतकरी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. “सभासद शेतकरी बांधव-भगिनींनी दाखवलेला विश्वास आणि कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत हीच आमची ताकद आहे. सर्वांना सोबत घेऊन सभासदांचे हित जपणे, शेतकऱ्यांची समृद्धी साधणे आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची प्रगती अधिक गतिमान करणे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे त्या म्हणाल्या.


कोणत्या गटातून कोण विजयी? पाहा उमेदवारांची यादी
१. उत्पादक सभासद प्रतिनिधी — निंबुत-खंडाळा (गट क्रमांक १)
एकूण वैध मते: २२,७५७ | अवैध मते: ४९९
काकडे प्रमोद भगवानराव — १४,९८१ मते
काकडे प्रियराज उर्फ अभिजित सतीशराव — १४,०४९ मते
दगडे वसंतराव रामराव — १३,९९९ मते
२. उत्पादक सभासद प्रतिनिधी — मुरुम-वाल्हा (गट क्रमांक २)
एकूण वैध मते: २२,७९७ | अवैध मते: ४६२
शिंदे राजवर्धन शिवाजीराव — १४,०१५ मते
गायकवाड रुषीकेश (ऋषिकेश) शिवाजी — १३,९४१ मते
भोसले विक्रम आनंदराव — १३,८५४ मते
३. उत्पादक सभासद प्रतिनिधी — होळ-मोरगाव (गट क्रमांक ३)
एकूण वैध मते: २२,६७० | अवैध मते: ५८९
सस्ते मकरंद चंद्रकांत — १४,३१६ मते
होळकर मनिषा आनंदकुमार — १४,२२६ मते
भापकर रविंद्र जयवंतराव — १२,०७५ मते
४. उत्पादक सभासद प्रतिनिधी — कोऱ्हाळे-सुपा (गट क्रमांक ४)
एकूण वैध मते: २२,७३४ | अवैध मते: ५२४
खलाटे अक्षय धनंजय — १४,५०० मते
बोरकर राजेंद्र हरिभाऊ — १३,८९६ मते
भगत सुनिल नारायण — १३,७४६ मते
५. उत्पादक सभासद प्रतिनिधी — मांडकी जवळार्जुन (गट क्रमांक ५)
एकूण वैध मते: २२,७४५ | अवैध मते: ५१३
जगताप सतीश संपत — १४,६४७ मते
धुमाळ उत्तम महादेव — १३,८७० मते
टेकवडे सुधाकर ज्ञानोबा — १३,८१९ मते
६. महिला राखीव प्रतिनिधी गट
एकूण वैध मते: २३,०११ | अवैध मते: ३७३
खोमणे प्रणिता मनोज — १४,३५६ मते
नाझीरकर छबुताई अंकुश — १३,५८३ मते
७. इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रतिनिधी गट
एकूण वैध मते: २२,७८८ | अवैध मते: ५९२
रासकर शैलेंद्र पंढरीनाथ — १४,५७७ मते
८. भटक्या विमुक्त जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी गट
एकूण वैध मते: २२,७८८ | अवैध मते: ५९२
धायगुडे अशोक चंद्रकांत — १४,५४० मते
९. अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी गट
एकूण वैध मते: २२,६२९ | अवैध मते: ७४४
साळवे व्दारकोजीराव गुलाब — १४,०६४ मते
१०. ब वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था गट
सोरटे संग्राम तानाजी — १३० मते
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीकडे सभासद शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. आता अंतिम निकाल जाहीर झाल्याने नव्या संचालक मंडळाकडून कारखान्याची प्रगती, सभासदांचे हित आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षांबाबत कोणती पावले उचलली जातात, याकडे लक्ष लागले आहे.
