तुझ्यासारखं मी सासऱ्याचं खात नाही ! छगन भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर टिकास्त्र ….!!

अंबड : “कोणाचं खाता कोणाचं खाता? असं सारखं म्हणतो, पण तुझे खातो काय रे ?” तुझासारखा सासऱ्याच्या घरी तुकडं मोडत नाही,
पोलिसांचा लाठीचार्ज झाला, त्यावेळी हा घरात बसला होता, राजेश टोपे व रोहित पवार यांनी .पुन्हा त्याला आंदोलनस्थळी बसवला असा गंभीर आरोप ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्ला चढवला आहे .

छगन भुजबळ पुढे म्हणाले, मराठा तरुणांना मला सांगायचे आहे की, या दगडाला शेंदूर लावून तुम्हाला कोणता देव करायचा आहे? याला आरक्षण कळेना, आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, जरांगेच्या आंदोलनावेळी 70 पोलिसांवर हल्ले झाले. त्यानंतरच पोलिसांनी त्या लोकांवर लाठीचार्ज केला. पण संबंध महाराष्ट्रासमोर चुकीचं चित्र गेलं. गृहमंत्रीच माफी मागू लागले, गुन्हे मागे घेऊ म्हणू लागले, त्यामुळे पोलिसांचं मनोबल खचलं,
लाठीचार्ज झाल्यावर हे सरदार (मनोज जरांगे पाटील) घरात जाऊन बसले. माजी मंत्री राजेश टोपे आणि आमदार रोहित पवार यांनी जरांगे पाटील यांना पहाटे तीन वाजता परत आणून बसवले. त्यांना सांगितलं, शरद पवार येणार आहेत. शरद पवारांना लाठीचार्ज का झाला, पोलिसांवर हल्ले कसे झाले हे मात्र सांगितलं नाही, असं छगन भुजबळ अशी छगन भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर टिका सोडली आहे.

जालन्यातील अंबडमध्ये आज ओबीसी महाएल्गार सभा पार पडली. यासभेस विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, महादेव जानकर आदी नेते उपस्थित होते.
