हगवणे कुटुंबाच्या वकिलांवर नेत्यांचा संताप! खडसेंनी तर वकिलाला मारण्याची ऑफरच दिली..


पुणे : पुण्यातील वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणी अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामुळे प्रकरणाला वेगळं वळण लागले आहे. असे असताना आता सुनेचा छळ करणारे आरोपी हागवणे यांच्याकडून कोर्टात अजब असा युक्तिवाद केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी हगवणे यांच्या वकिलाने वैष्णवीच्याच चरित्रावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

हुंड्यासाठी सुनेचा छळ आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या हागवणेंनी आता मृत वैष्णवीवरच दोषारोप केल्याचे काल समोर आले. नवऱ्याने बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का प्लास्टिकची छडी म्हणजे हत्यार आहे का? असा सवाल हगवणेंच्या वकिलांकडून करण्यात आला. यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

यावर राजकीय वर्तुळात महिला नेत्या चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी एक ऑफरच जाहीर केली आहे. वैष्णवी प्रकरणात अजब युक्तिवाद करणाऱ्या त्या वकिलाच्या जो कोणी चार कानाखाली मारेल त्याचा मी जाहीर सत्कार करणार असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त करत ‘पोरीला हालहाल करून मारलं तरी अजून मन नाही भरलं तर मारल्यानंतरही तिच्या चारित्र्यावर बोलतां अरे हरामखोरांनो लांडग्याच्या पुढची औलाद आहे रे तुमची. माणसं नाहीचं तुम्ही. असे ट्विट केले आहे. यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागले असून अनेकांनी त्या वकिलावर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या मृत्यूच्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. हुंड्यासाठी छळ झाल्याचा आरोप करत पोलिसांनी तिच्या सासरच्या पाच नातलगांना अटक केली आहे. याबाबत तपास सुरू असताना अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!