Land Rule : तुकडेबंदी कायद्यात झाला मोठा बदल! आता ‘एवढ्या’ गुंठ्यांच्या जमीनीची खरेदी आणि विक्री करता येणार, शेतकऱ्यांना दिलासा..
Land Rule : एक महत्वाची बातमी समोर आली आहे. सरकारने तुकडेबंदी कायद्यात सुधारणा केली असून त्यानुसार, ५ गुंठे जमिनीची खरेदी-विक्री करता येणार आहे. यामुळे यासंबंधीची कामे आता उरकणार आहेत.
याअगोदर जिरायतीसाठी ८० गुंठे आणि बागायतीसाठी २० गुंठे क्षेत्राच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध लावण्यात आले होते. यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. यामुळे याबाबत अनेकदा मागणी केली जात होती.
आता विक्रेता आणि खरेदीदारांना विनंतीपत्रासोबत संबंधित कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. तसेच संबंधित कागदपत्रे देखील अचूक असावी लागणार आहेत. यामुळे काम देखील लवकरात लवकर होणार आहे.
आवश्यक कागदपत्रे..
विनंतीपत्र
८ अ आकाराची नक्कल
विक्रेता आणि खरेदीदारांची ओळखपत्रे
७/१२ उतारा
अशी असेल प्रक्रिया..
विक्रेते आणि खरेदीदारांना जिल्हाधिकाऱ्याकडे विनंतीपत्र सादर करावे लागणार आहे.
परवानगी पत्र आधारे विक्रेते आणि खरेदीदारांना खरेदी-विक्री करता येईल.
एक वर्ष असेल मंजुरी..
शेत रस्ता, विहीर, व्यक्तीगत लाभार्थ्यांसाठी केंद्र किंवा राज्य ग्रामीण गृहनिर्माण योजनेच्या प्रयोजनासाठी जमिनीच्या हस्तांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी फक्त एक वर्षासाठीच असेल हे लक्षात घ्या.