काळुराम गोते गोळीबार प्रकरणी उरुळीकांचन पोलिसांकडून सहा जणांना अटक ! भूमाफिया बापू शितोळे मुख्य सूत्रधार ….

जयदीप जाधव
उरुळी कांचन : भूमाफियाला दिलेले अर्थिक व्यवहारातील पैसे परत देण्याच्या वादातून कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील एका बड्या भूमाफिया व त्याच्या कुटुंबीयांनी एकावर गोळीबार केला आहे तर एकाला बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी (14) दुपारी घडली आहे. याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बापू उर्फ दशरथ शितोळे असे भूमाफियाने नाव असून त्यांची पत्नी निलिमा शितोळे, मुलगा जिग्नेश शितोळे, (रा. तिघेही, इनामदार वस्ती, कोरेगाव मूळ, ता. हवेली) आणखी एक महिला नाव व पत्ता माहीत नाही) अक्षय भोसले, निखिल भोसले, असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर काळूराम गोते असे गोळीबार करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर त्यांचा चुलत भाऊ शरद गोते याला मारहाण करण्यात आली आहे. आरोपी बापू शितोळे यांना पोलिसांनी अटक केली असून इतर फरार पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी शरद कैलास गोते वय 36 व्यवसाय- शेती रा. भिवरी (ता. हवेली),यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वरील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापू शितोळे व फिर्यादी शरद गोते हे एकमेकांचे परिचीत असुन त्यांचेत आर्थिक देवाण घेवाणीचे व्यवहार आहेत.बापू शितोळे हे शरद गोते यांना चाळीस लाख देणे होता.ते मागण्यासाठी गोते व जखमी शरद गोते बापू शितोळे यांच्या घरी आले होते.
त्यांच्यात पैसे परत देण्यावरून वाद झाला.त्यात बापू शितोळे याने त्यांचे कडील परवाना प्राप्त अग्नी षस्त्रातुन फिर्यादीवर व साक्षीदार यांचेवर गोळीबार करून जिवे ठारे मारण्याचा प्रयत्न केला यामध्ये काळूराम गोते हा जखमी झाला.
यावेळी बापू शितोळे तसेच निलिमा शितोळे, मुलगा जिग्नेश शितोळे यांनी शरद गोते याला मारहाण केली. अक्षय भोसले, निखिल भोसले, यांनी शरद गोते याला मारहाण केली व पडलेल्या पिस्टलच्या पुंगळया घेतल्या व एका महिलेने घटनास्थळावरील रक्त पुसुन टाकुन पुरावा नश्ट करून आरोपी स सहाय्य केले. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील करीत आहेत.
दरम्यान, बापू उर्फ दशरथ शितोळे यांच्यावर पुणे शहर पोलीस ठाण्यातील चतःश्रुुगी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये याअगोदर गुन्हा दाखल आहे.