Lalit Patil Drugs Case : राज्यात खळबळ! ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी हादरवणारी माहिती आली समोर..

Lalit Patil Drugs Case पुणे : ड्रगमाफिया ललित पाटीलला मुंबई साकीनाका पोलिसांनी शिताफीने बंगळुरूमधून अटक केली आहे. ड्रग्स माफिया ललित पाटील याला अटक केल्यानंतर आता पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत त्याने धक्कादायक खुलासे केले आहेत. Lalit Patil Drugs Case
त्यामुळे अनेकजण गोत्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच ललित पाटील याने पोलीस आता चौकशीत आणखी एक मोठा खुलासा केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. २०२१ पासून नाशिकच्या शिंदे गावात एमडीचं उत्पादन सुरू होते. Lalit Patil Drugs Case
दर महिन्याला या ठिकाणाहून ५० किलो एमडीची निर्मिती केली जात होती. या एमडीचा सप्लाय मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि नाशिकसह राज्यातील अन्य शहरांमध्ये केला जात होता, असं पोलीस चौकशीत समोर आले आहे. ड्रग पेडलर्सच्या नेटवर्कच्या मदतीने हा एमडीचा पुरवठा होत होता.
यातून ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील दर महिन्याला तब्बल ५० लाख रुपयांचा नफा कमावत होते, असे पोलीस चौकशीत समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात १६ आरोपींना अटक केली आहे. आणखी काहीजण पोलिसांच्या रडारवर आहेत.
तसेच ललित पाटील याच पैशाच्या जोरावर हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि पोलिसांना मॅनेज करत असल्याचे त्याच्या चौकशीतून उघड झाले आहे. ससूनमधील मुक्काम वाढवण्यासाठी डॉक्टर आणि पोलिसांना तो सातत्याने पैसे देत होता.
ललित पाटील ससून रुग्णालयातून ड्रग्ज सिंडिकेट चालवत होता आणि ससूनच्या बाहेर जाऊन बैठका घ्यायचा, अशी माहितीही ललितने पोलिसांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे. या प्रकरणात सरकारमधील दोन मंत्र्यांचा हात असल्याचा आरोप शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.