Ladki Bahin Yojana : आता चारचाकी, ट्रॅक्टर असला तरीही मिळणार लाडक्या बहीण योजनेचा लाभ? अजित पवारांनी थेट सभेत मोठं भाष्य करून विषय मिटवला….


Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देणार आहे.

तसेच अधिवेशन आणि निवडणूक पार पडल्यानंतर अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बारामती येथे जनसन्मान मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना अजितदादा यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलचा एक मोठा किस्सा सांगितला.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अनेक संभ्रम पसरविले जात आहेत. मोठा गोंधळ निर्माण करण्यात येत आहे. मात्र, अजितदादा यांनी भर सभेत या विषयाचा खुलासा केला. तसेच, एक महत्वाची घोषणाही केली. Ladki Bahin Yojana

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सभेत एका किस्सा सांगितला. ते म्हणाले, ‘एका महिलेने मला चार चाकी वाहन असल्यावर या योजनेचा लाभ मिळेल का? असे विचारले. त्यावर मी तिला चार चाकीच काय? ट्रॅक्टर असला तरी लाभ मिळेल असे सांगितले.

त्यावर तिने पुन्हा माझे पती ड्रायव्हर आहेत. रात्री घरी येताना ते गाडी घेऊन येतात. मग, तुमचे अधिकारी ती गाडी आमचीच समजतील आणि योजनेचा लाभ देणार नाहीत असे म्हटले. असे गैरसमज अनेक महिलांचे होत आहेत.

पण, तमाम ड्रायव्हर आणि त्यांच्या पत्नींना सांगू इच्छितो जे ड्रायव्हर आहेत त्यांच्या पत्नीला या योजनेचा लाभ मिळेल. पण, तुमच्या स्वत:च्या नावावर चारचाकी असेल तर मात्र तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!