Ladki Bahin Yojana : तुमच्या खात्यावर लाडकी बहीणचे पैसे येणार की नाही? आता तुम्ही पात्र आहात की नाही? ‘असं’ करा चेक…

Ladki Bahin Yojana : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या नवीन कार्यकाळातील पुढचा आठवडा महत्त्वाचा ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधिमंडळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली.
त्यांनी योजनेचा पुढील हफ्ता कधी आणि किती मिळणार याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. फडणवीस म्हणाले की, हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता येईल. साधारण २३ तारखेपासून लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे यायला सुरू होती.
त्याआधी अनेक भागांमध्ये महिलांचे अर्ज बाद झाले आहेत. पुण्यात जवळपास १० हजार अर्ज तर जळगाव, लातूर भागातही हजारोंच्या संख्येनं अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. निकषांची पूर्तता न केल्याने हे अर्ज बाद झाले आहेत. Ladki Bahin Yojana
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की तूर्तास तरी निकषांमध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत. २१०० रुपये मिळण्यासाठी लाभार्थी महिलांना बजेटपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. शिवाय एकाच घरातील दोन महिलांना देखील लाभ मिळण्याबाबत लवकरच निर्णय होऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे. ज्यांना पाचवा हप्ता आचारसंहितेमुळे मिळाला नाही त्यांना पाचवा आणि सहावा हप्ता आता मिळणार आहे.
या महिलांच्या खात्यावर येणार नाहीत पैसे…
ज्यांनी चार खाती उघडली आहेत, किंवा जे फसवणूक करून पैसे घेत आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. उत्पन्न अडीच लाखांहून अधिक असेल, तर लाभ मिळणार नाही. चारचाकी गाडी असेल तर लाभ मिळणार नाही. सरकारी नोकरी करणारा कुटुंबातील व्यक्ती असेल तर लाभ मिळणार नाही.
लाभार्थी महिलांनी ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपल्या हप्त्याचं स्टेटस चेक करू शकता. तुम्ही या साईटवर मोबाईलनंबरने अकाउंट सुरू करा. त्यानंतर स्टेटस चेक करू शकता. तुम्हाला पैसे आले की नाही याबाबत माहिती मिळेल.तुमचा अर्ज बाद झाला असेल तर खात्यावर पैसे येणार नाहीत.