Ladki Bahin Yojana : राखीपोर्णिमेलाच मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना मिळणार पंधराशेची भेट…
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
ही योजना दोन ते तीन महिनेच टिकेल असा दावा विरोधक करीत आहेत. सुरुवातीला या योजनेच्या पात्रतेचे नेमके निकष काय यावरुन बराच गोंधळ उडाला होता. आता कुठे याबाबत स्पष्टता आल्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार, याचे वेध लागले आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. ही योजना दोन ते तीन महिनेच टिकेल असा दावा विरोधक करीत आहेत. सुरुवातीला या योजनेच्या पात्रतेचे नेमके निकष काय यावरुन बराच गोंधळ उडाला होता. आता कुठे याबाबत स्पष्टता आल्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार, याचे वेध लागले आहेत. Ladki Bahin Yojana
:लाडकी बहीण योजनेला लाभ येत्या राखीपौर्णिमेपासूनच सुरू होईल. राज्यातील दीड कोटी महिलांच्या खात्यात त्यादिवशी प्रत्येकी पंधराशे रुपये जमा होतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले.
या योजनेमुळे राज्य आर्थिक संकटात जाईल, या विरोधकांच्या आरोपाला काहीही अर्थ नाही, असा दावाही पाटील यांनी केला. राज्यातील अटीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ होईल असे ते म्हणाले.
दरम्यान, योजनेची माहिती देण्यासाठी पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पाटील यांनी विरोधक कसलीही माहिती न घेता बोलतात, अशी टीका केली. शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, वैशाली नागवडे तसेच पक्षाचे अन्य स्थानिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.