Ladki Bahin Yojana 2024 : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! निवडणूकीनंतर योजना बंद होणार की सुरू राहणार, खरी माहिती आली समोर…


Ladki Bahin Yojana 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेची घोषणा राज्य सरकारकडून केल्यानंतर विरोधक मात्र सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत

दरम्यान, शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरे यांनी आम्ही सर्व निर्णय रद्द करू, असे म्हणाले होते. त्यामुळे होणाऱ्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना महाविकास आघाडीला भारी पडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या योजनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा भाष्य करत ही योजना बंद होणार नसल्याचा शब्द लाडक्या बहिणींना दिला आहे. Ladki Bahin Yojana 2024

ते म्हणाले, ‘सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळी महाविकास आघाडीने खोडा घातला. ते हायकोर्टात गेले तिथे त्यांना कोर्टानं चपराक दिली. त्यानंतर काँग्रेसचा अनिल वडपल्लीवार नावाचा व्यक्ती नागपूर कोर्टात गेला. त्यामुळे लाडकी बहीण ही योजना विरोधकांच्या पोटात सलतेय आणि त्यांच्या डोळ्यात खुपतेय. असे शिंदे म्हणाले आहे.

ते पुढे म्हणाले की, राज्यातील लाडक्या बहिणींनी ठरवलंय, या लाडक्या भावांना पुन्हा सरकारमध्ये आणायचं. आमच्या या योजना असतील जसं की, लाडकी बहिणी योजना कोणी किती मायका लाल आला तरी ही योजना बंद पडणार नाही, ही योजना वाढत जाईल, त्याचे पैसेही वाढत जातील. मात्र जे या योजना बंद पडतील त्यांना लोक घरात बसवतील, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!