Ladki Bahin Yojana 2024 : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! डिसेंबरचा हप्ता ‘या’ दिवशी होणार खात्यात जमा…


Ladki Bahin Yojana 2024 : ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. अंतरिम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. त्यानंतर लगेचच या योजनेची अंमलबजावणी सुद्धा झाली.

जुलैपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या लाडकी बहीण योजनेला संपूर्ण राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला. निवडणुकीपूर्वी लागू करण्यात आलेली ही योजना महायुतीसाठी गेंम चेंजर ठरल्याचं बोललं जात आहे.

आता निवडणुका पार पडल्यावर राज्यात पुन्हा सरकार स्थापन झाले आहे. पण डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी जमा होणार असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. याच प्रश्नाचं उत्तर आता समोर आले आहे.

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे पाच हफ्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. त्यापैकी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हफता एकत्रच आचारसंहिता लागण्यापूर्वी जमा करण्यात आला होता. महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले होते. Ladki Bahin Yojana 2024

त्यानंतर राज्यात लागू झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना रखडली. मात्र पुन्हा एकदा आता आचारसंहिता संपताच हालचालींना वेग आला आहे. डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वच लाडक्या बहिणींचे लक्ष लागले होते.

त्यांच्यासाठी आता दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे डिसेंबरचे पैसे आता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. याबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे. लाडक्या बहीण योजनेचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मिळतील असं त्यांनी म्हटलं आहे.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group