Kurla Bus Accident : कुर्ला बस अपघातप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुःख व्यक्त, ५ लाखांची मदतही केली जाहीर…


Kurla Bus Accident : मुंबईतील कुर्ला परिसरात बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्ब्ल ३० ते ३५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा बसमध्ये तब्बल ६० प्रवासी प्रवास करत होते. कुर्ल्यातील या अपघातामुळे मुंबईकर हादरले आहेत.

कुर्ला पश्चिमेला असलेल्या एस.जी.बर्वे रोडवर काल सोमवारी रात्री ९. ३० वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यावेळी साधारण ६० प्रवासी या बसमधून प्रवास करत होते. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. Kurla Bus Accident

देवेंद्र फडणवीसांनी मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे केली. देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी साडे दहा वाजता एक ट्वीट करून त्यांनी कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात मृत्यू झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी त्यांनी प्रार्थनाही केली. Kurla Bus Accident

कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत’, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!