अभिनेत्री क्रिती सेनने मंदिराबाहेर किस केल्याने पुजारी भडकले, म्हणाले हॉटेल रूममध्ये जा आणि…
मुंबई : अभिनेत्री क्रिती सेनन वादात अडकली आहे. मंदिराबाहेर तिने केलेला एक किस यासाठी कारणीभूत ठरला आहे. यानंतर यावरुन दोन गट पडले असून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
तिचा हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 7 जून रोजी क्रिती सेनन तिरुपतीमधील वेंकटेश्वरा मंदिरात दर्शनासाठी गेली होती. यावेळी तिला बघण्यासाठी गर्दी झाली होती.
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल; जाणून घ्या..
यावेळी मंदिराच्या बाहेर निरोप घेताना दिग्दर्शक ओम राऊत याने क्रिती सेननला गालावर किस केल्याने हा वाद निर्माण झाला आहे. यानंतर तेलंगणाच्या चिलकूर बालाजी मंदिराच्या मुख्य पुजारींनी त्यांच्यावर टीका केली.
पुजारींनी हॉटेल रुम बूक करा असा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, ही एक निषेधार्ह कृती आहे. पती आणि पत्नीही मंदिरात एकत्र जात नाहीत. तुम्ही हॉटेल रुममध्ये जाऊन हे करु शकता. तुमचं वागणं हे रामायण आणि देवी सीतेचं अपमान करणारे आहे.
बैलाने काढला सगळ्या गावकऱ्यांचा घाम! घराच्या छतावर चढला बैल अन्..
दरम्यान, 6 जून रोजी तिरुमला येथे ‘आदिपुरुष’ चित्रपटाला ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. यासाठी ‘आदिपुरुष’ चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. बुधवारी ओम राऊत आणि क्रिती सेनन तिरुपतीमधील वेंकटेश्वरा मंदिरात दर्शनासाठी आले होते.
क्रितीने यानंतर ट्विट करून म्हटले आहे की, तिरुपती मंदिर भेटीदरम्यान मिळालेलं प्रेम आणि आपुलकीबद्दल तिने आभार मानले आहेत. चाहत्यांचे आभार मानताना क्रितीने आपलं मन सकारात्मकतेने भरलं असल्याचं म्हटलं आहे.