धायरी फाटा ते धायरी गाव, पुण्यात कोयता गॅंगची पोलिसांनी काढली धिंड…!


पुणे : सध्या पुणे शहरात कोयता गॅंगने धुमाकूळ घातला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असताना पोलीस प्रशासन देखील सतर्क झाले आहे. पुणे पोलिसांनी कोयता गँगमधील गुडांची धिंड काढून त्यांना धडा शिकवला आहे.

यामुळे त्यांना आता आळा बसणार आहे. पुणे पोलिसांनी या गुँडांना सबक शिकवण्यासाठी धायरी फाटा ते धायरी गाव अशी कोयत्या गँगची धिंड काढली आहे. नागपूर येथे झालेल्या अधिवेशनात देखील हा मुद्दा उपस्थित केला गेला होता.

दरम्यान, अल्पवयीन मुलावर कोयता गँगमधील गुंडांनी कोयत्याने वार केले होते. त्या गुडांच्या पोलिसांनी मुसक्या अवळत त्यांना अटक केली आहे. या गॅंगमध्ये देखील अनेक अल्पवयीन मुलं आहेत.

पुण्यातील भैरवनाथ मंदिराजवळ काही दिवसांपूर्वी काही गुंडांनी धुडगूस घातला होता. यामध्ये भाजी मंडई येथे कोयते हातात घेऊन दहशत निर्माण केली होती. तसेच एका मुलावर कोयत्याने वार केले होते. यामुळे पोलिसांनी कारवाई केली आहे.

सराईत तीन गुंडांना सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर कोयता गँगची धिंड धायरी फाटा ते धायरी गाव दरम्यान काढण्यात आली आहे. यामुळे ही परिस्थिती बंद होण्यास मदत होईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!