पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, ४७ लाखांची रोकड लुटली, पुण्यात खळबळ….!


पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरू आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता कोयता गँगने धुडगूस घालून दुचाकीस्वाराकडील ४७ लाख रुपयांची रोकड लुटून नेल्याची घटना नाना पेठेत घडली आहे.

 

 

बँकेत भरणा करण्यासाठी ४७ लाख रुपये रोकड घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वाराला अडवून कोयतेधारी टोळक्याने धाक दाखवून लुटले. या घटनेने नाना पेठेत गोंधळ उडाला होता. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

 

 

खासगी संस्थेत काम करणारी फिर्यादी व्यक्ती संस्थेची ४७ लाख २६ हजार रुपयांची रक्कम व १४ धनादेश घेऊन बँकेत चालली होती. यावेळी नाना पेठेत त्यांची लूट केल्याचा आरोप आहे.

 

 

 

याबाबत मंगलपुरी भिकमपुरी गोस्वामी (वय ५५ वर्ष, रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. नाना पेठेतील सार्वजनिक रस्त्यावर हा प्रकार घडला. फिर्यादी यांच्या दुचाकीसमोर गाडी आडवी लावून त्यांना अडवले. त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड असलेली पिशवी जबरदस्तीने घेऊन ते पसार झाले. या मारहाणीत फिर्यादीच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!